“गुलाबी साडी अन् लाली लाल लाल…” वय साठीपार पण आजी-आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही थिरकायला लागाल

Viral Video Of Gulabi Sadi Song : जोडीदार कसा असावा? हे जर आपल्याला कोणी विचारले तर इच्छा-अपेक्षांची एक यादी तयार असते. पण, काही जणांच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा नसतात. फक्त प्रत्येक सुखदुःखात तो साथ देणारा आणि विश्वासू असावा एवढीच आशा असते. पण असे असले तरीही थोडा खेळकर स्वभाव, आपल्या मनातले ओळखणारा, घरकामात मदत करणार, तर डान्स करता येत नसेल तरी हातात हात घेऊन तो क्षण अगदी खास करणारा एक जोडीदार प्रत्येकालाच हवा असतो आणि हा स्वभाव अगदी म्हातारपणापर्यंत राहावा असेही कुठेतरी वाटतं असतं. म्हणायला हरकत नाही. तर आज सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा (आजी-आजोबांचा) व्हिडीओ व्हायरल ( Viral Video) होत आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇

 

View this post on Instagram

 

A post shared by @kritikaneel_

‘गुलाबी साडी’ हे गाणे आपल्यातील प्रत्येकाने ऐकलेच असेल. या गाण्याने भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. अगदी सामान्यांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींना देखील या गाण्याची भुरळ पडली. तर आज आजी-आजोबा या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले आहेत. व्हिडीओत लग्न समारंभ सुरु असतो. यादरम्यान या दोघांनी ‘गुलाबी साडी’ गाण्यावर जबरदस्त हावभाव देत डान्स केला आहे. जोडप्याचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा ( Viral Video) …

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, ‘गुलाबी साडी’ गाण्यावर जबरदस्त हावभाव देत डान्स केला आहे. गाण्यातील प्रत्येक ओळीवर जोडप्याच्या स्टेप्स, त्यांचे हावभाव, दोघांचा निरागसपणा अगदी बघण्यासारखा आहे. याचबरोबर व्हिडीओच्या शेवटी ‘दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ या गाण्याच्या ओळींवर मात्र आजीने दिलेल्या पोझ तर आजोबांनी काढलेले फोटो पाहून तुमचेही मन जिंकेल एवढं तर नक्कीच. डान्सची आवड, त्यांचा उत्साह पाहून तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाहीत.

 

Leave a Comment