सिलेंडरवर बसून चालत्या बाईकवर आजोबा करतायत स्टंट, VIDEO पाहून बसेल धक्का

Old man bike stunt आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा स्टंटबाजी करताना पाहिली असेल; पण ते स्टंट खूप काळजी घेऊन केले जातात. सिनेमाची गोष्ट सोडली, तर आता अनेक जण प्रत्यक्षात प्रसिद्धीसाठी, सोशल मीडियावरील काही व्ह्युज, लाइक्ससाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि स्टंट करतात. हे स्टंट पाहून अनेकदा आपल्याच अंगावर काटा येतो. या स्टंटबाजीमध्ये अनेकदा त्यांचा जीवदेखील जातो.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by || || (@fact_by_pratham)

अनेकदा असे धोकादायक स्टंट तरुण जास्त प्रमाणात करतात. बाईक वेडीवाकडी चालवणं, कोणत्या उंच इमारतीवरून उडी मारणं, भररस्त्यात स्टंट करणं असे तरुणांचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील; पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणताही तरुण नाही, तर एक आजोबा धक्कादायक स्टंट करताना दिसत आहेत. एक आजोबा चालत्या बाईकवर सिलेंडरवर बसून धोकादायक स्टंट करत आहेत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल. या व्हिडीओमध्ये आजोबा जीवघेणा स्टंट करताना दिसतायत. आजोबा बाईक चालवताना दिसत आहेत, पण सीटवर न बसता ते सिलेंडरवर बसून बाईक चालवत आहेत. बाईकच हॅंडल हाताने न पकडता आजोबा बाईकचा बॅलन्स आपल्या पायाने कंट्रोल करत आहेत. चालत्या बाईकवर हा जीवघेणा स्टंट करत असताना हे आजोबा अगदी हसत खेळत सिलेंडरवर बसलेले दिसतायत.

 

Leave a Comment