महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिन्याला मिळणार 2100

Ladaki Bahin Yojana राज्यात सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं.विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या या मोठ्या विजयामागे लाडकी बहीण योजना हे सर्वात मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. दरम्यान, राज्याच्या लाभार्थी महिलांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर विश्वास ठेवला. आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एकनाथ शिंदेंनी केलं लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा
महायुतीने त्यांच्या जाहीरनाम्यात वचन दिलं होतं की, त्यांना पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये केले जातील. माजी मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यात केलेल्या वचनानुसार, राज्यातील महिलांना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळतील.मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाडकी बहीण योजनेची मासिक रक्कम 1500 रुपयांनी वाढवून 2100 रुपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात घेतला जाईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार?
शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेचा पाचवा हफ्ता आचारसंहिता लागू होण्याआधी अॅडवान्समध्ये महिलांच्या खात्यात जमा केला. आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळू शकतो लाडकी बहीण योजनेचा लाभ
राज्यातील ज्या महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याती या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये मिळू शकतात.

Leave a Comment