‘लाडकी बहिण’ची पडताळणी कशी होणार?

लाडकी बहिण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे. या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार? ते जाणून घेऊया.

उत्पन्नाचा दाखला

अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख असणे आवश्यक आहे. त्याची माहिती देणारे कागदपत्रं सादर करणे आवश्यक आहे.

आयकर प्रमाणपत्र

लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा, अशी अट आहे. त्यामुळे त्याची छाननी केलेली जाईल.

सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन

जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चारचाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शेती

पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा

एका कुटुंबातील फक्त 2 महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.