महिलांनो! ‘या’ दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 2100 December 5, 2024 by Abhi Ladaki bahin december installment राज्यातील महिलांना आर्थिकृदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळालं. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला बहुमताचा आकडा पार करता आल्याची चर्चा आहे. परंतु, महिलांना आतापर्यंत पाच हफ्त्यांचे 1500 रुपये देण्यात आले आहेच. पण आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली आहे. लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा राज्यातील पात्र महिलांना जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरच्या हफ्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. अशातच महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली होती. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती”, असं ट्वीट तटकरे यांनी केलं होतं.