“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल

Goat viral video चित्त्याच्या वेगाबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. मात्र, आपण बोलणार आहोत अशा महाकाय प्रजातीबत जी ताशी १२ मैल इतक्या वेगाने धावू शकते. भिंतीवर चालणारी महाकाय प्रजाती इतकी वेगवान कशी होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आपण ज्या प्रजातीबाबत बोलत आहोत, तिचा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की ती एखाद्या मगरीपेक्षा कमी नाही. होय, तुम्ही तिला घोरपड मानायला तयार नसाल. तिचे नाव कोमोडो ड्रॅगन आहे. ही प्रामुख्याने इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर आढळते. हिला पृथ्वीवरील सर्वात मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यांमधील सर्वात मोठी प्रजाती आहे. हिची लांबी १० फूट इतकी आहे. या प्राण्यानं एका जिवंत बकरीला अवघ्या ५ सेकंदात गिळून टाकलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बकरीचा त्याच्या पोटातून ओरडण्याचा आवाज येतोय.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल. तुम्ही या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बकरीला पाहू शकता. ही बकरी शांतपणे जमिनीवर बसली आहे. कदाचीत तिला कुठेतरी दुखापत झाली असल्याची शक्यता देखील आहे. कारण घोरपड येताना पाहून ती भितीनं थरथरतेय पण तरी देखील तिनं तेथून पळ काढला नाही. अन् शेवटी त्या प्राण्यानं तिला जिवंत गिळून टाकलं. या बकरीच्या वेदना ड्रायगनच्या पोटातून ऐकू येताहेत.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा कोमोडो ड्रॅगन ज्याला चावतो त्याचा मृत्यू निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विषारी प्राणी त्यांच्या मोठ्यातले मोठी शिकार देखील करू शकतात. हा इतका भयानक असतो की, एखादा प्राणी एकदा का याच्या तोंडात फसला आणि जरी तो जीव वाचवून पळून गेला तरी विषामुळे त्याचा मृत्यू होणार हे नक्की. अशा परिस्थितीत, हा प्राणी वास घेत जखमी शिकारीजवळ पोहोचतो. आपली शिकार आता फार दूर पळू शकणार नाही हे त्याला पक्के ठाऊक असते. आणि तो हल्ला करतो.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या महाकाय प्राणी अस्वल आणि म्हशींना देखील मारू शकतो. ते त्यांच्या वजनाच्या ८० टक्के मांस एकाच वेळी खाऊ शकतात. त्यांची पचनक्रिया मंद असते. अशा परिस्थितीत, मोठ्या शिकारीची शिकार केल्यानंतर, ते पचण्यासाठी सूर्यस्नान करतात. एकदा खाल्ले की ते महिनाभर टिकते. या घोरपडी इतक्या मोठ्या शिकारी आहेत की त्या सहा मैल दूरवरून वास घेऊ शकतात.

 

Leave a Comment