धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral

Falling from running train रेल्वेमध्ये प्रवास करताना अनेकदा प्रवासी नको ते स्टंटबाजी करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या अशाच एका व्हिडिओ चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वेच्या दरवाज्यामध्ये उभी राहून डोके बाहेर काढून उभ्या असलेल्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये पुढे जे घडले ते पाहून काळजात धस्स होईल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

रविवारी कोलंबो श्रीलंकेत ट्रेनमधून प्रवास करणारी एक चिनी महिला धोकादायकरित्या दरवाज्यामध्ये उभी होती. धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहून डोके बाहेर काढणे महिलेच्या जीवावर बेतले असते. धावत्या रेल्वेच्या दरवाजात डोके बाहेर काढून उभी असताना तिचे डोके अचानक एका झाडाला धडकल्याने ती ट्रेनमधून पडली. हा सर्व प्रकार व्हिडिओ शुट करत असताना घडल्याने कॅमेऱ्यात कैद झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ट्रेनमधून जमिनीवर कोसळली तरी तिला किरकोळ दुखापत झाली.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

या घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, मुलगी ट्रेनच्या दरवाजाच्या हँडरेल्सवर हात धरून धोकादायकपणे बाहेर झुकताना दिसत आहे. अशी माहिती मिळाली की ती पर्यटक तिच्या मैत्रिणीच्या मदतीने व्हिडिओ रेकॉर्ड करत होती जेव्हा तिने भितीदायक पोज दिली आणि ती झाडावर आदळली.

“पर्यटक आणि तिचा मित्र वेलवाट्टे आणि बंबालापिटिया दरम्यानच्या देशातील सुंदर किनारपट्टीचा शोध घेण्यासाठी ट्रेनमधून प्रवास करत होते. जेव्हा ती दरवाज्याजवळ आली आणि रीलच्या वेडापायी धोकादायक पद्धतीने तिथे उभी राहिली तेव्हा एका झाडाच्या फांद्याने तिचे डोके धडकले”, असे स्थानिक वृत्त माध्यमांनी सांगितले. किरकोळ दुखापती झाली पण ती वाचली.

दृश्य भयावह असताना पोलिसांनी मीडियाला सांगितले की,”ती किरकोळ जखमी होऊन चमत्कारिकरित्या बचावली.”

 

Leave a Comment