भाजपच्या मंत्र्यांची यादी पाहण्यासाठी
देवेंद्र फडणवीस संभाव्य मंत्र्यांना फोन करणार-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतरच मंत्रिपदांवर शिक्कामोर्तब होईल. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादी (BJP Cabinet Minister List) समोर आली आहे.
भाजपच्या मंत्र्यांची यादी पाहण्यासाठी
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूरमध्ये-
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे उद्या पहिल्यांदा नागपूरमध्ये आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भाग पूर्णता भगवामय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुरात त्रिकोणी पार्क परिसरामध्ये सध्या प्रत्येक घरावर विशेष रोषणाई करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस याच त्रिकोणी पार्कचे रहिवाशी आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी अशी तयारी केली आहे.