aditi tatkare Ladaki bahin महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला आहे. या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट देण्याची सरकारची तयारी सुरु झाली आहे. राज्यभरातील 13 लाख महिलांना हे रिटर्न गिफ्ट मिळणार आहे. या महिलांचे अर्ज बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे प्रलंबित होते. परंतु आता त्यांचे अर्ज मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील 2.34 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये सरकारतर्फे दिले जात आहे. ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते.
1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
1ली लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी