मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 2100 रुपये यादीत नाव पहा

Aditi tatkare  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. लोकसभेला महायुतीला राज्यात मोठं अपयश पाहावं लागलं होतं. परंतु, त्यानंतर राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना आणली. महायुतीमधील नेत्यांनी या योजनेचा व त्यामार्फत महायुती सरकारचा जोरदार प्रचार केला गेला. परिणामी महायुतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या.

या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार

यादीत नाव पहा

विरोधकांनीही लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले. महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या या योजनेतील काही लाभार्थ्यांना मात्र आता लाभापासून वंचित राहावं लागू शकतं, अशी चर्चा समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. या योजनेचे निकष आता बदलले जातील, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील असे दावे केले जात आहे. याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाला सातत्याने विचारणा होत आहे. तसेच माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. अखेर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत पसरत असलेल्या अफवांचं खडणं केलं आहे.

या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार

यादीत नाव पहा

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेले संभ्रम देूर करणारं एक पत्रक जारी केलं आहे. आमदार आदिती तटकरे यांनी हे पत्रक समाजमाध्यमांवर शेअर केलं आहे. या पत्रकासह तटकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाजमाध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये ही नम्र विनंती”.

महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या पत्रकात काय म्हटलंय ?

महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकात म्हटलं आहे की “सर्वांना कळविण्यात येते की राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या असे निर्दशनास आलेले आहे की, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजमाध्यमांवर रील्स व व्हिडीओंद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून या कार्यालयाकडे विचारणा होत आहे. या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. तसेच महिला व बालकल्याण विभागाने वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांना सुचवलं आहे की त्यांनी लोकांधील संभ्रम दूर करावा. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपलेस्तरावरुन तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी”.

Leave a Comment