लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? समोर आली मोठी बातमी December 3, 2024 by Abhi ladaki bahin yojana महायुती सरकारनं ज्या कुटुंबातील महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जुलैपासून लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेची गती मंदावली होती. मात्र आता पुन्हा एकदा या योजनेच्या अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा महिलांना पुन्हा अर्ज भरून देण्यास सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा एक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला होता. लाडकी बहीण योजनेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती. तर आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा मात्र राज्यात आता पुन्हा एकदा महायुती सरकार आलं आहे, त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे 2100 चा हफ्ता कधीपासून द्यायचा याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर घेतला जाईल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पामध्ये याबाबत चर्चा करून हा हप्ता नेमका कसा द्यायचा? हे ठरवलं जाईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की ही योजना सुरूच राहणार आहे. मात्र अडीच लाखांच्यावर ज्यांचं उत्पन्न आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. ज्या महिला कर भरतात त्यांचा अर्ज या योजनेसाठी अपेक्षित नसल्याचं देखील यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.