लाडक्या बहिणांना १५००चे २१०० रुपये कधी मिळणार? सरकारने सांगितली ही तारीख December 3, 2024 by Abhi Aditi Tatkare विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरुन मतदान केलं. लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांच्या बँक खात्यात महिन्याला १५०० रुपये जमा होऊ लागले. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरली. सरकार पुन्हा सत्तेत आल्यास १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होतं. यावर आता भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना मिळणारे पैसे १०० टक्के वाढणार असल्याचं मुनगंटीवार यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘आम्ही १५०० चे २१०० रुपये केले नाहीत तर देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये याचं उदाहरण दिलं जाईल. आम्ही शब्द पाळला नाही, असं देशभरात सांगण्यात येईल. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम राहून तो खरा करुन दाखवायला हवा. जाहीरनामा समितीचा चेअरमन मीच होतो. त्यामुळे संकल्पपत्रातील घोषणा आम्ही नक्कीच पूर्ण करु,’ असं मुनगंटीवार यांनी मुलाखतीत म्हटलं. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महिलेला २१०० रुपये देण्याची राज्याची क्षमता आहे. आता ही वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. जानेवारीपासून रक्कम वाढवायची की जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल. आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती. त्यामुळे आम्ही २१०० रुपये पुढील भाऊबीजेपासून देऊ शकतो, अशा शक्यता मुनगंटीवारांनी सांगितल्या. लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ४५ हजार कोटी रुपयांचा बोजा पडत आहे. आता १५०० रुपयांचे २१०० रुपये केल्यास सरकारी तिजोरीवर आणखी किती भार पडेल, असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर आपण जे व्याज भरतो, त्यापेक्षा ही रक्कम कमीच असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. दरवर्षी सातव्या वेतन आयोगावर आपण जितका खर्च करतो, त्यापेक्षाही लाडकी बहिणवरील खर्च कमीच आहे. महिलांना पैसे दिले जात असतानाच लोक असे प्रश्न का विचारतात, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.