Live मुख्यमंत्र्यांचा शपथविधी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा December 5, 2024 by Abhi Maharashtra cm swearing in ceremony live काही क्षणांत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जय्यत तयारी चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शपथविधी कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका अनेकांना देण्यात आल्या आहेत. यात गायक, अभिनेते, अभिनेत्र्या, उद्योगपती, राष्ट्रीय पातळीवरचे नेते, क्रीडा क्षेत्रातील मोठे चेहरे तसेच देशभरातील नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. शपथविधीचा कार्यक्रम लाईव्ह बघण्यासाठी येथे क्लिक करा👇👇👇 फडणवीस यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक मुंबईत दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईत पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. आझाद मैदान परिसरात एकूण 1500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे मुंबई शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित असतील. त्यामुळेच या कार्यक्रमात कोणतीही चुकभूल होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज संध्याकाळी साडे पाच वाजता शपथविधीचा कार्यक्रम होईल.