मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल December 5, 2024 by Abhi viral videos असं म्हणतात मोबाईलचा अतिवापर चांगला नाही पण आज प्रत्येक जण मोबाईलचा गरजेपेक्षा जास्त वापर करताना दिसतात. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतोच. सोशल मीडियामुळे मोबाईलचा क्रेझ आणखी वाढत आहे. अनेकदा मोबाईलच्या नादात कोणाचा जीव जातो तर कधी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी याच मोबाईलमुळे अनेक गमती जमती सुद्धा घडतात. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by ⛳😊मराठी दुनिया😊⛳ (@marathiduniyaa) सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मोबाईलच्या नादात एका महिलेने असे काही केले की तुम्ही पोट धरून हसाल. ती चक्क नवऱ्याला विसरली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं प्रकरण काय? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. हा व्हायरल व्हिडीओ एका पेट्रोल पंपावरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जोडपे दुचाकी घेऊन पेट्रोल पंपावर येतात. महिला फोनवर बोलत असते. त्यामुळे ती दुचाकीवरून खाली उतरते. ती फोनवर बोलता बोलता पेट्रोल पंपाच्या आजुबाजूला फिरत असते. तोवर तिचा नवरा पेट्रोल भरत असतो. फोनवर बोलता बोलता ती चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या गाडीवर बसते आणि निघून जाते. तिचा नवरा मात्र पेट्रोल भरताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.