रेल्वे रुळावर झोपला तरुण वरून गेली रेल्वे हा धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल December 4, 2024 by Abhi Railway viral video काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा या स्टंटबाजीच्या नादात ते आपला जीव धोक्यात घालतानाही विचार करीत नाहीत. अनेकदा धावत्या ट्रेनसमोर काही जण रील्स बनवताना दिसतात. अनेकदा या रील्समध्ये लोक अशा काही भयानक गोष्टी करतात की, पाहून काळजात धडकी भरते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुण चक्क धावत्या ट्रेनखाली झोपून स्टंटबाजी करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा https://twitter.com/i/status/1863998195489292353 सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेक तरुण व्यक्ती धावत्या ट्रेनसमोर उभे राहून स्टंट करताना दिसतात. या स्टंटबाजीत आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. पण, त्यानंतरही लोक त्यातून धडा घेत नाहीत. असाच एक तरुण धावत्या ट्रेनच्या खाली रुळांमध्ये झोपून स्टंटबाजी करत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रेल्वे ट्र्रॅकच्या मधोमध जाऊन झोपला. तो तरुण रुळांच्या मधे झोपताच थोड्या वेळाने एक भरधाव ट्रेन त्या रुळांवरून गेली. ट्रेन खूप वेगात असल्याने ती काही सेकंदांत रुळांवरून पुढे गेली. यावेळी तो तरुण ट्रॅकच्या मधोमध पडून होता; पण ट्रेन जाताच त्याचा एक मित्र त्याला उठण्यास सांगतो. त्यानंतर तो खूप आनंदी होऊन तिथून उठतो; जणू काही त्याने काहीतरी मोठे धाडसी काम केले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे केवळ व्हिडीओसाठी त्या तरुणाने अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घातला होता.